महिंद्रा समूह हा 20.7 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा कंपन्यांचा समूह आहे. जो आपल्या विलक्षण मोबिलिटी सोल्यूशन्सद्वारे जनतेच्या विकासास सहाय्य करतो, ग्रामीण समृद्धीचा वेग वाढवितो, शहरी जीवनात सुधारणा करतो, नवीन व्यवसायांना प्रोत्साहन देतो आणि समाजाची उन्नती साध्य करतो. हा समुह भारतातील युटिलिटी वाहने, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा आणि व्हेकेशन ओनरशिप क्षेत्रात अग्रणी स्थानावर आहे आणि एकुण आकारमानानुसार संपूर्ण जगात ही एक सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषी व्यवसाय, एरोस्पेस, व्यावसायिक वाहने, सुटे भाग, संरक्षण क्षेत्र, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, अक्षय ऊर्जा, स्पीडबोट्स आणि स्टील यासह इतर अनेक व्यवसायांमध्येही ह्या समुहाचे अतिशय मजबूत स्थान आहे. भारतात मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये सुमारे 100 देशांमध्ये 2,40,000 कर्मचारी काम करत आहेत.
महिंद्राबद्दल अधिक माहिती जाणून घ्याः www.mahindra.com वर /ट्विटरवर आणि फेसबुक: @MahindraRise