BLAZO ची क्रांती, इंधनाची बचत करण्याची स्मार्ट पद्धती
नाविन्यपूर्ण FuelSmart स्विचेस सह महिंद्राने विद्यमान टेक्नॉलॉजी मध्ये सुधारणा केली, ज्यामुळे इंधनाची कार्यक्षमता व त्याचप्रमाणे मायलेजमध्ये देखील वाढ झाली.
CRDe चा लाभ
महिंद्राने नेहमीच भविष्याचा दृष्टीकोन स्वीकारला आहे. 9 देशांमध्ये CRDe इंजिन्समधील एक दशकाहून अधिक अनुभवावरून हे स्पष्ट दिसून येते. हे खर्चाच्या बाबतीत प्रभावी तंत्रज्ञान आहे जे परफॉर्मन्स आणि विश्वसनियता याबाबतीत जरा देखील तडजोड करत नाही. भारताच्या प्रत्येक प्रकारच्या प्रदेशात महिंद्राचे CRDe इंजिन कार्यरत आहे.
mPOWER FuelSmart सह महिंद्रा BLAZO X BS6 ची कमीत कमी बदलांसह चाचणी करण्यात आली आहे आणि विश्वासपात्र ठरले आहे आणि भारतीय औद्योगिक वाहतूक उद्योगाच्या बदलत्या चेहऱ्याचे आव्हान स्वीकारून बदलत आहे.
स्मार्ट चे दिल
7.2 लिटर डिस्प्लेसमेंट (विस्थापन) असलेल्या महिंद्राच्या mPOWER FuelSmart इंजिनमध्ये प्रचंड रिझर्व क्षमता आणि एक दशकाहून अधिक काळ CRDe चे कौशल्य आहे. मल्टी मोड स्विचेससोबत एकत्रितपणे हे इंजिन अद्वितीय कामगिरी करते. जेव्हा तुम्हाला पॉवर, पिकअप आणि पुलिंगची क्षमता हवी असते तेव्हा कोणताही बदल न करावा लागता तुम्हाला मायले देते.
त्याचवेळी, हे इंजिन उत्सर्जन कमी करते आणि तुमचे पुढील अनेक वर्ष स्वच्छ आणि हरित पद्धतीने काम करते.