महिंद्रा ट्रक आणि बस मोबाईल सव्र्हिस व्हॅन
महिंद्रा ट्रक आणि बस डिव्हिजन सव्र्हिस व्हॅन ही एक आगळीवेगळी सुविधा आहे जी कधीही, कोठेही खराब झालेल्या वाहनापाशी पोहोचते. ड्रायव्हर 24X7 केव्हाही NOW सव्र्हिस हेल्पलाईनवर संपर्क करून मोबाईल व्हॅनकडे आपल्या ट्रक किंवा बससाठी रोडसाईड मदत मागू शकतात. ही व्हॅन गरजू वाहनाच्या लोकेशनची माहिती मिळविते आणि तेथे पोहोचून आवश्यक मेकॅनिकल मदत करते. आणि लवकरात लवकर वाहन चालू करते. म्हणजे वाहन कमीत कमी काळ नादुरूस्त राहते आणि अधिकाधिक उत्पादकता देते.