अॅग्रिगेट
अधिक सुरक्षितता, अधिक आराम, अधिक ट्रिप्स, अधिक नफा.
महिंद्रा BLAZO X हा भारतातील सर्वात आरामदायी ट्रक आहे. आमचे ड्रायव्हर्स हे भारतीय वाहतुकीचे खरे चाक आहेत आणि ते त्यांचे अर्धे आयुष्य केबिनमध्ये घालवतात. याचाच विचार करून ही बनविण्यात आली आहे आणि त्यांना आराम आणि सुरक्षितता देण्यासाठी यात अनेक वैशिष्ट्ये आहेत. उदा. 4 पॉइंट सस्पेंडेड केबिन जी खरोखर ड्रायव्हिंगचे काम अधिक आरामदायी बनविते. केबिनमधील त्रास कमी करण्यासाठी यात एर्गोनॉमिक दृष्टीकोनातून योग्य ठिकाणी बसविलेले कंट्रोल्स आहेत.
टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंगमुळे ड्रायव्हरला त्याच्या सोयीनुसार स्टिअरिंग अॅडजस्ट करता येते. रुंद विंडशील्ड आणि मोठ्या रियर व्ह्यू मिररमुळे मागील दृश् स्पष्ट दिसते. अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम मुळे अधिक वेगातही ब्रेकिंगवर अधिक चांगले नियंत्रण राहते. दुसऱ्या शब्दांत, हा ट्रक सुरक्षित, थकवा न येता ड्रायव्हिंग करता येईल अशा प्रकारे बनविलेला आहे ज्याचा अर्थ ड्रायव्हरला कमी वेळा थांबावे लागते, कमी वेळेत जास्त अंतर पार करता येते आणि टर्नअराउंड वेळेत सुधारणा होते.
नवीन Mahindra BLAZO X रेंजमध्ये कार सारखी ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम (DIS) देखील आहे ज्यामुळे ड्रायव्हरला वाहनाविषयी महत्वाची माहिती प्रत्यक्ष वेळेत मिळते. इंजिन आर/मिन (r/min), तापमान, वेग आणि इंधनाची पातळी या व्यतिरिक्त, यात ब्रेक प्रेशर, ट्रिप किमी, प्रति किमी डिझेलचा वापर, बॅटरी व्होल्टेज, सर्विस रिमाइंडर आणि इतर महत्त्वाचे तपशील देखील आहे.
चांगल्या परफॉर्मन्ससाठी, चांगले बिल्ट असणे महत्त्वाचे आहे.
चाकण येथील ग्रीनफिल्ड प्लांट, भारतातील सर्वात प्रगत उत्पादन संयंत्रांपैकी एक आहे जेथे महिंद्रा द्वारा ट्रक बनविले जातात. मोठ्या प्रमाणातील चाकण प्लांट देखील बारिक तपशीलाकडे लक्ष देण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक वाहनाची रोबोटिक अचूकतेने आणि अत्यंत काळजीपूर्वक जुळणी केली जाते ज्यामुळे उच्च दर्जाची विश्वासार्हता प्राप्त होते. तरुण, अतिशय उत्साही आणि उत्तम प्रशिक्षण घेतलेली तंत्रज्ञांची तुकडी या प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या गुणवत्तेची काळजी घेतो. येथील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत कार्यपद्धती यामुळे हा कारखाना संपूर्ण जगाला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाहनांचा पुरवठा करतो.
आमच्या ट्रक्सची निर्मिती करताना आम्ही सर्वाधिक अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीचा अंदाज केला आहे. याच कारणामुळे हे ट्रक अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत जे सातत्याने जबरदस्त कामगिरी करतात. कितीही भार असो, रस्ता कसाही असो TAG/PUSHER LIFT AXLE टायर्सची झीज व तूट कमी होईल याची काळजी घेतात. A BOGIE SUSPENSION तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा भार आणि विविध प्रकारची भूपदेशाची परिस्थिती हाताळण्यात मदत करतात. 395 मिमी व्यासाचा क्लच आणि हेवी ड्यूटी गिअरबॉक्समुळे तुम्हाला सुरक्षित आणि सुरळीत ड्रायव्हिंगसाठी मदत होते. मजबूत चॅसिस, भरवशाचे 10 बार पेशर असलेले S-cam एअरब्रेक्स आणि रियर लीफ सस्पेंशन मुळे हा ट्रक अत्यंत मजबूत आणि विश्वासार्ह बनतो. अनेक वर्ष कोणत्याही त्रासाशिवाय काम करता यावे यासाठी हेवी ड्युटी फ्रंट अॅक्सेल बसवण्यात आला आहे.
हे सर्वांचे मिळून करण्यात आलेले डिझाईन अशा प्रकारे करण्यात आले आहे की, ते टिकाऊ बनतात, सातत्याने उत्तम कामगिरी करतात आणि त्यासाठ कमीतकमी देखभालीची गरज लागते.