महिंद्रा ट्रक आणि बस डिव्हिजन ही महिंद्रा समुहाच्या संपूर्ण मालकीची उफपनी आहे आणि यू. एस. डॉलर्स 20.7 बिलियनच्या महिंद्रा समुहाचा एक भाग आहे जो संपूर्ण एकात्मिक ट्रकिंग सोल्यूशनसची संपूर्ण श्रेणी देतो. कंपनीने विविध कामांसाठी खास डिझाईन केलेले ट्रक बनवून आणि व्यवसायाच्या सर्व गरजांसाठी सर्वोत्तम कामगिरी करून कामगिरीला एका नव्या उंचीवर नेले आहे. महिंद्राने भारतीय ट्रक उद्योगात उच्च कार्यक्षमता करणारी वाहने, विक्रीपश्चात सेवा, विस्तारित वॉरंटी आणि ब्रँडच्या इतर अनेक फायद्यांसह एक नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे.
महिंद्रा ट्रक्स अँड बसेस इंटिग्रेटेड निराकरणांची संपूर्ण श्रेणी प्रदान करते जी ग्राहकांना त्वरित टर्नअराउंड वेळेत आणि महिंद्राच्या प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेच्या विश्वासासह ग्राहकांना नफा मिळविण्यास मदत करते. ‘Made in India, Made for India' या तात्विक पायावर आधारित भारतीय गरजा पूर्ण करण्यासाठी HCV उत्पादनांची श्रेणी तयार करण्यात आली आहे. महिंद्रा ट्रक आणि बस डिव्हिजनचे 52,000 हून अधिक HCV ट्रक रस्त्यावर कार्यरत आहेत. कंपनी व्यावसायिक वाहन बाजाराच्या पत्येक विभागासाठी 3.5 टन GVW ते 55 टन GVW पर्यंत विविध प्रकार सादर करून कार्गो आणि विशेष लोड अॅप्लिकेशन्सच्या विविध आवश्यकता पूर्ण करून, व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेतील प्रत्येक विभागाच्या गरजा पूर्ण करण्याच्या तयारीत आहे.चाकण येथील नवीन ग्रीन फील्ड प्लांटमध्ये मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या नवीन श्रेणीची निर्मिती सुरू आहे. हा प्लांट 700 एकराच्या विस्तीर्ण परिसरात असून रु. 4,000 कोटींहून अधिक गुंतवणूक करून त्याची उभारणी करण्यात आली आहे. महिंद्राची इतर उत्पादनेही येथे बनविली जातात. यामुळे महिंद्रा समूहाला संघटित उत्पादन सुविधेच्या सिनर्जीचा फायदा करून घेता येतो. कंपनी 6 वर्षे किंवा 6 लाख कि.मी.ची हस्तांतरणीय वॉरंटी देते, जी या उद्योगातील प्रथमच दिली जात आहे आणि अतिशय किफायतशीर AMC आहे, त्याचप्रमाणे कमीतकमी देखभाल खर्च आणि सक्षम विमा पॅकेज, MCOVER देऊ करते.
LCV विभागामध्ये महिंद्रा ट्रक आणि बस विभागाचा बाजारातील हिस्सा 9.4% आहे. अगोदरच 2,00,000 पेक्षा अधिक वाहने रस्त्यावर असून संपूर्ण भारतात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी ही डिव्हिजन तयार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या झहीराबादमधील सुविधेत LCV रोड व्हेहिकल्स आणि बसेसच्या संपूर्ण श्रेणीचे उत्पादन केले जाते. महिंद्रा ट्रक्स आणि बसेस आपल्या विक्रीपश्चात सेवा आणि स्पेअर्सच्या नेटवर्कचा झपाट्याने विस्तार करत आहेत, यात सध्या 100 3एस डीलरशिप्स, 193 अधिकृत सव्र्हिस सेंटर्स, 39 M-Parts प्लाझा आणि 2,000 हून अधिक नेटवर्क पॉइंट्सवर स्पेअर्सचे नेटवर्क आहे त्यामुळे ग्राहकांना महत्त्वाच्या ट्रकिंग मार्गांवर उत्तम सपोर्ट मिळतो. कंपनीपाशी आता भारतातील पहिली बहुभाषिक 24×7 हेल्पलाइन NOW आहे, ज्यात ग्राहकांना आणि ड्रायव्हर्सना तात्काळ मदत देण्यासाठी तांत्रिक तज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. NOW मोबाईल सव्र्हिस व्हॅन आणि मोबाईल वर्कशॉप्समुळे या सपोर्ट नेटवर्कची पोहोच आणि तत्परता अधिक सक्षम झाली आहे.